
दाढी कटिंग 50 रुपये

सलून व्यवसायावर आली संक्रांत
ग्रामपंचायत ने टाकलं सलुनच दुकान
दाढी कटिंग फक्त 50 रुपये
अहमदनगर जिल्हा नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने महागाईच्या नावाखाली थेट सलून व्यवसायात पदार्पण केले आहे.
पंचायतीने सुरू केलेल्या सलून मधे आपले समाज बांधव प्रल्हाद नाईक हे अर्ध्या भावाने संपूर्ण गावाला सलून सेवा देत आहेत.
केस ३०रुपये आणि दाढी २० रुपये इतक्या कमी दराने सेवा दिली जात आहे.
बांधवांनो,
आमच्या सलून व्यवसायासाठी ही धोक्याची घंटा असून या गावचे अनुकरण इतर ग्रामपंचायती देखील करतील आणि हळू हळू आमच्या व्यवसायावर संक्रांत येऊ शकते.
कोरोना महामारीतून कसाबसा आपला व्यवसाय सावरत असताना आता हे एक नवीन आव्हान पुढे येऊन ठाकले आहे.
नेवासा तालुक्यातील समाज कार्यकर्ते या घटनेचा विरोध करीत असून लवकरच काहीतरी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
समाजातील सर्व कार्यकर्त्यानी हा विषय गभिर्याने घेऊन या विरोधात ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
0 Comments
सदरील वेबसाईट हि शासनाची नसुन शासनाच्या योजनांची फक्त माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या वेबसाईट च्या माध्यमातून केल जात.या वेबसाईट वरील माहिती पुर्णपणे इतर माहिती सी जुळवुन पहावी.