मुख्यमंत्री सहाय्यता निधी
कसा प्राप्त करावा?
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजनेच्या अंतर्गत विस प्रकारच्या गंभीर आजारासाठी 25 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळवता येते.तर आज आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजने बद्दल माहिती घेणार आहोत.हा कोणत्या गंभीर आजारासाठी मिळतो? त्यासाठी अर्ज कोठे करावा? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणजे काय?
(Mukhaymantri Sahayta Nidhi)
मित्रांनो कोविड 19 च्या काळात मुख्यमंत्री कार्यालयालातर्फे जनतेकडे निधी साठी आव्हान करण्यात आले होते आणि बर्याच जनांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी च्या नंबर वर पैसे टाकले होते.आसे महाराष्ट्रातून लाखो करोडो रुपये श्रीमंत लोकांनी निधी जमा केला होता या पैशाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी असे म्हटले जाते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी खात्यावर जमा झालेले पैसे जनतेच्या कल्याणासाठी विविध विस प्रकारच्या आजारांवर गरजुंना आजाराची तीव्रता लक्षात घेऊन त्याप्रमाणात दिले जातात.या पैशाला सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधी असे म्हटले जाते.
कोणकोणत्या आजारात जनतेला मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळतो ते विस प्रकारचे आजार पुढील प्रमाणे आहेत.
👇👇👇👇👇👇👇👇
वरील सर्व आजारात गरीब गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्राप्त करता येतो.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पात्रता
मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्राप्त करण्यासाठी रग्नाची काय काय पात्रता आहे ते पुढील प्रमाणे आहेत
१) रुग्ण महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभार्थी नसावा.
२) रुग्न आयुष्मान भारत योजनेचा लाभार्थी नसावा
३) रुग्न राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम चा लाभार्थी नसावा
४) रुग्न डिस्चार्ज झालेला नसावा.
५) धर्मदाय रुग्णालयात उपचार घेनारा लाभार्थी रुग्ण या योजनेसाठी पात्र नाहीत.
उपरोक्त योजनेचा लाभ मिळु न शकणार्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासुन अर्थसहाय्य दिले जाते.संपर्क-022-22026948.
Email ID -aao.cmrf-mh@gov.in
१) विहीत नमुन्यातील अर्ज
२) निदान व उपचारासाठी लागणार्या वैद्यकीय खर्चाचे सिव्हिल सर्जन यांच्या कडून प्रमाणीत केलेले प्रमाणपत्र.
३) तहसील कार्यालयाचे एक लाख साठ हजार रुपयाच्या आत उत्पन्न आसलेल प्रमाणपत्र
४) रुग्नाचे आधारकार्ड महाराष्ट्र राज्याचे
५) रुग्णांचे रेशनकार्ड महाराष्ट्र राज्याचे.
६) संबंधित आजारांचे रिपोर्ट असने आवश्यक.
७) अपघात रुग्णाचा MLC रिपोर्ट आवश्यक आहे.
८) प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC/ शासकीय समितीची माण्यता आवश्यक आहे.
९) रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
अर्थसहाय्यासाठी मागणी ई मेल द्वारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात पाठवुन त्यांच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाद्वारे तात्काळ पाठविण्यात यावेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा अर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा




0 Comments
सदरील वेबसाईट हि शासनाची नसुन शासनाच्या योजनांची फक्त माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या वेबसाईट च्या माध्यमातून केल जात.या वेबसाईट वरील माहिती पुर्णपणे इतर माहिती सी जुळवुन पहावी.