Jivaji mahale smarak pratapgad


  जिवाजी महाले स्मारकाचे 

  काम सुरू करावे खासदार 

 अमोल कोल्हे यांना निवेदन

  जिवाजी महाले स्मारकाचे काम सुरू करावे


शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे मुख्य अभिनेते तसेच लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांना नाभिक सेवा संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , 

      Jivajimahalesmarakpratapgad प्रतापगडावर अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून इतिहास "होते जिवाजी म्हणून विचारले शिवाजी" या म्हणीने इतिहासात अजरामर झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या प्रतापगड येथील स्मारकाचे काम मागील सतरा वर्षांपासून रखडले असुन त्या स्मारकाच्या कामात खासदार अमोल कोल्हे यांनी लक्ष घालून जिवाजी महाले स्मारकाचे काम पुर्ण करावे . जेणेकरून प्रतापगडावर येणार्या पर्यटकांना शुरवीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची ओळख होईऊ असे नाभिक सेवा संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

   शुरवीर मावळ्यांचा अपमान थांबवा

     खासदार अमोल कोल्हे यांना देण्यात आलेल्या निवेदनात दुसरी मागणी असी करण्यात आली की लग्नकार्यात, हॉटेल वर मावळ्यांच्या वेषभुषेत तरुणांना उभे करून त्यांच्याकडून अनेक कामे करुन घेतली जातात ही कामे करत असताना त्यांची वेशभूषा मावळ्यांची असु नये.हॉटेल मध्ये लग्नकार्यात मावळ्यांच्या वेशभूषेवर बंदी घालावी.

           खासदार अमोल कोल्हे यांना देण्यात आलेले निवेदन नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष -श्री माधव भाले, औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष श्री संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते अमर झेंडे यांच्या वतीने देण्यात आले