नाभिक समाजाने आत्मपरीक्षण करावे : NABHIK SAMAJ
नमस्कार मित्रांनो नाभिक परिवार वेबसाईट वर आपले स्वागत आहे.मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी कोणत्याही शासकीय योजना नाभिक समाजापर्यंत पोहोचवल्या नाही.याचे नेमक कारण काय? यावर NABHIK SAMAJनाभिक समाज सेवक श्री चंद्रशेखर जगताप यांनी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले मांडले आहेत ते त्यांच्याच शब्दांत.
नाभिक समाजाला आत्मपरीक्षणाची गरज...
![]() |
| NABHIK SAMAJ SEVAK |
मनोगत श्री चंद्रशेखर जगताप (पुणे) || NABHIK SAMAJ
गुरव समाजाला शासकीय उत्तम योजना मिळाली. मग आपल्या "NABHIK SAMAJ" नाभिक समाजाने अनेक वर्ष मागणी करूनही आपल्याला "श्री संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ" का मिळत नाही? आपण कुठे कमी पडतो? आपल्याला त्यासाठी कोणत्या मार्गाने जायला हवे? आर्थिक दुर्बल आणि विकास साठी कोणते निकष कसे सिद्ध करावे लागतील? विकासाच्या आराखड्यात समावेश होण्यासाठी सामाजिक कायदेशीर कागदपत्रे कोणती आहेत. नाभिक समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत आज नाभिक समाजाची एकूण सर्वांगीण परिस्थितीचां सविस्तर अभ्यास करून शासना समोर मांडवा लागेल. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकमुखी गट, समन्वय समिती माध्यमातून शासन दरबारी याची अभ्यासपूर्ण समाजाला या आर्थिक विकास महामंडळाची गरज आवश्यकता मांडवी लागणार आहे. नाभिक समाजाला सध्या सर्वाभिमुख एकमुखी समिती माध्यमातून या विषयी आपल्याला राज्यस्तरीय सरकारी योजनेचा आणि स्वतंत्र निधीचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत अस मला वाटते.
नाभिक समन्वय समितीची गरज || NABHIK SAMAJ
सर्वांनाच विश्वासात घेवून एकमेव समिती स्थापन करून शासन दरबारी आपले म्हणणे, आपली व्यथा कथा, आणि प्रलंबित मागण्यासाठी एक उत्तम मार्ग मिळू शकेल. यासाठी अंतर्गत असलेले सगळे दुरावे, मतभेद, वादविवाद बाजूला सारून फक्त फक्त NABHIK SAMAJनाभिक समाजाच्या उन्नती साठी सर्वांगीण विकासासाठी आणि मागण्या मंजूर करण्यासाठी एकत्र येण्याची खूप खूप मोठी गरज या महाराष्ट्रातील नाभिक समाजाला आवश्यक होवून बसली आहे. महाराष्ट्रातील नाभिक समाजाला मी खरंच हात जोडून नम्र विनंती आवाहन करतो की आपण सर्वांनी समाजाच्या भविष्यातील पिढीच्या विकासासाठी एकत्र येवू आणि महाराष्ट्रात मोठी सामाजिक क्रांती घडवूयात. अशी सर्वांना कळकळीची विनंती करत आहे.
नाभिक समाजाने शिक्षणाची कास धरावी
👇👇👇👇👇👇👇
आपला समाजसेवक
चंद्रशेखर जगताप, पुणे
NABHIK SAMAJ


0 Comments
सदरील वेबसाईट हि शासनाची नसुन शासनाच्या योजनांची फक्त माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या वेबसाईट च्या माध्यमातून केल जात.या वेबसाईट वरील माहिती पुर्णपणे इतर माहिती सी जुळवुन पहावी.