शिवपुत्र संभाजी महानाट्यात
कुमारी सायली घोडके
शिवपुत्र संभाजी महानाट्यात 250 कलाकार
शिवपुत्र संभाजी या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांचा सत्य इतिहास जिवंत देखाव्यानिशी दाखवला आहे.हे महानाट्य तीन तासाचे असुन या महानाट्यात 250 कलाकारांचा समावेश आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत खुद्द अभिनेते, लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे हे असून औरंगजेबाच्या भुमिकेत डॉ गिरीश ओक हे असुन या महानाट्यात स्थानिक कलाकारांना पण संधी देण्यात आली आहे.Shivputra Sambhaji Mahanatya
सायली घोडके गावकऱ्यांच्या भुमिकेत संधी
शिवपुत्र संभाजी या महानाट्यात नाभिक समाजाची औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ ची कुमारी सायली घोडके हिला पण गावकऱ्यांची भुमिका करण्याची संधी मिळाली असून सायली घोडके हिच्या कडे उत्तम वक्तृत्व कला आहे.सायली घोडके हिने गेल्यावर्षी नाभिक सेवा संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता.Shivputra Sambhaji Mahanatya
सायली घोडके हिने सांगितले की माझी निवड मी वकृत्व स्पर्धेत नरवीर शिवाजी काशीद यांच्या बद्दल जे घोषवाक्य म्हटले होते तोच डायलॉग म्हणून दाखवला तेव्हा माझी निवड झाली."Shivputra Sambhaji Mahanatya"
नाभिक सेवा संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेमुळे मला आत्मविश्वास मिळाला त्यामुळे माझी शिवपुत्र संभाजी या महानाट्यात निवड झाली.

0 Comments
सदरील वेबसाईट हि शासनाची नसुन शासनाच्या योजनांची फक्त माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या वेबसाईट च्या माध्यमातून केल जात.या वेबसाईट वरील माहिती पुर्णपणे इतर माहिती सी जुळवुन पहावी.