Salonvali Shantabai


      सलूनच काम करणारी शांताबाई 
         Salonvali Shantabai

Salonvali Shantabai ऐन तारुण्यात पतीचे निधन झाले आणि चार मुलीसह शांताबाई च्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला.कधी घराबाहेर न पडलेल्या शांताबाई ला मजुरीसाठी वनवन फिरावे लागू लागले तरीही चार मुलींना पोटभर अन्न मिळेना म्हणून आपल्या पतीचा सलून व्यवसाय करण्याच धाडस चाळीस वर्षांपूर्वी शांताबाई ने विचारच केला नाही तर प्रत्यक्षात आनला आणि स्वाभिमानाने आपल्या घराचा रहाडा चालवून चारही मुलींचे लग्न लावून दिले.आशा या जिद्दी नाभिक महिलेची सत्य कहाणी खास आपल्या वाचकांसाठी.

  आधुनिक विचारांची सुरवात शक्यतो शहरी भागात होते जस अनेक स्त्रिया रिक्षा चालवने,कार चालवन पण खेड्यात राहुन पुरुषांची मक्तेदारी असलेल्या सलून व्यवसायाला चाळीस वर्षांपूर्वी सुरवात करनारी पहिली नाभिक महिला म्हणजे शांताबाई श्रीपती यादव हि कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हासुर सासकीरे गावची आहे.

      अचानक पतीचे निधन

         गाव खेड्यात सलुन चे काम करनारे शांताबाई चे पती अचानक बिमार पडले, गोळ्या औषध केले पण इलाजाला प्रतिसाद मिळाला नाही आणि एक दिवस ते स्वर्गवासी झाले आणि शांताबाई च्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. चार मुली आणि शांताबाई   Salonvali Shantabai यांच्या समोर जिवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला कारण घरी शेती नव्हती. कधी बाहेर न निघनारी शांताबाई मोलमजुरीसाठी कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण गावात मोलमजुरी मिळेनासी झाली. एक एक दिवस चुल पेटेनाशी झाली. खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला. शांताबाई काय करावे चार मुली कशा जगवायच्या हा प्रश्न निर्माण झाला होता. पाहुणे राहुने यांनी पाट फिरवली. 

                  घरात पतीचा फोटो नव्हता पण पतीची धोपटी होती जीच्यावर कुटुंबाला जगवण्याची ताकत होती पण पतीचे निधन झाल्याने ती खुंटीला अडकून होती.

Salonvali Shantabai

           सलून व्यवसायाला सुरुवात

        शांताबाई च्या डोक्यात प्रश्न  निर्माण झाला की  आपण आपल्या पतीचा सलून चा व्यवसाय का करू नये. आणि एका दिवशी एक लहान मुलगा कटिंग करण्यासाठी शांताबाई च्या घरी आला त्याला माहीत नव्हतं की शांताबाईचे पती निधन झाले आहे. त्या मुलाकडे पाहून शांताबाईला जगण्याचा मार्ग दिसला आणि तिने खुंटीला अडकवलेली धोपटी खाली घेतली आणि त्या मुलाची कटिंग केली. कटिंग बरोबर झाली नाही परंतु सुरुवात तर चांगली झाली. शांताबाई  Salonvali Shantabai ला एक आशेचा किरण मिळाला की आपल्या पतीप्रमाणे आपणही सलून चा व्यवसाय करावा आणि तिने सुरुवात केली. परंतु गावातील व्यक्ती शांताबाई कडे दाढी कटिंग करून घ्यायला तयार नव्हती तेव्हा गावातले सभापती हरिभाऊ  कडूकर यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि शांताबाई च्या हाताने दाढी कटिंग करून घेतली. एवढ्याच नव्हे तर सभापती साहेबांनी संपूर्ण गाव गावात दवंडी दिली. गावकऱ्यांनी शांताबाई च्या हाताने दाढी कटिंग करून घ्यावे आणि हो शांताबाई ला सुद्धा ताकीद दिली कोणी जर वाकड्या नजरेने पाहत असेल तर आडवा वस्तरा उभा करायला भिऊ नको. मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरोखर परिवर्तनाला सुरुवात झाली शांताबाई पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने दाढी आणि कटिंग करू लागल्या आणि आपल्या कुटुंबाची चूल पेटू लागल्या तिला वर्षाकाठी धान्य मिळत होते.

शांताबाई माणसापेक्षा जनावरांची वाट पहात होती.

            शांताबाई कडे गावातील लहान थोर मुले येत होती परंतु त्यावेळेस दाढी कटिंग पाच हजार रुपयाला होती आणि म्हैसी भादरायची असली तर ती पन्नास रुपये मिळत होते त्यामुळे शांताबाई माणसावर पेक्षा जनावर म्हणजेच म्हैशीला भादरण्याची वाट जास्त पाहत होत्या कारण म्हैसी मुळे त्यांना पन्नास रुपये मिळत होते."Salonvali Shantabai"

    शांताबाईने केली चार मुलींचे लग्न केले

शांताबाई ने गावामध्ये दाढी कटिंग चे काम करून आपल्या चारही मुलींची लग्न लावून दिली तेही चांगल्या घरी. आज शांताबाई 70 वर्षाची झाली तरीही कोणापुढे हात न पसरवता स्वाभिमानाने पुरुषांच्या दाढी कटिंग करून आपला उदरनिर्वाह करते. शांताबाईच्या या कार्यामुळे शांताबाई नुसत्या कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण भारतात आज प्रसिद्ध झाले आहेत.

     शांताबाई अनेक पुरस्काराने सन्मानित

शांताबाई ने एका खेडेगावात केलेली हे समाज परिवर्तन, पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढणे ही जशी जशी शहरी भागात माहिती झाली तसे तसे शांताबाईचे मानसन्मान वाढला. आज शांताबाई च्या घरी अनेक पुरस्कार अनेक स्मृतिचिन्ह लटकवलेली दिसतात. अनेक वृत्तवाहिन्या वृत्तपत्र यांनी शांताबाईचे कार्याची दखल घेतली. ज्या शांताबाईला स्त्रीवादाचा विचारही वाचता येत नव्हता आज तीच शांताबाई स्त्रीवादाच्या विचारवंतांच्या अभ्यासक्रमात जाऊन बसली. अशीही शांताबाई.Salonvali Shantabai.